Highlights:-






All the courses you need
Institute
All the courses you need
Institute
All the courses you need
Institute
Institute
Institute
Institute
About the Sanstha & College :-
1) सह्याद्रि शिक्षण संस्थेविषयी :-
महाराष्ट्रातील कोंकण हा गिरी शिखरांच्या दुर्गम ग्रामीण प्रांत. गरीबी, अशिक्षितता, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी ग्रासलेला प्रदेश. अशा बिकट भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागात तळागाळातील सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणारे भगीरथ म्हणजेच स्व. गोविंदरावजी निकम. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षांपासून अंतिम श्वासापर्यंत कार्य जोपासले. १९५७ साली सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना करून सावर्डे येथे पहिले माध्यमिक विद्यालय सुरु केले. आज या संस्थेची ३३ माध्यमिक विद्यालये, २ मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, ५ उच्च माध्यमिक विद्यालये, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या १८ शाखा आहेत. फक्त कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना परराज्यातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करून नोकरी बरोबरच विविध व्यवसायात कार्यरत आहेत. ज्ञानावरील अमाधश्रद्धा, ध्येय, चिकाटी व अथक परिश्रम या चार सूत्रीच्या बळावर स्व. निकम साहेब शिक्षण क्षेत्रातील शिक्षणमहर्षी तसेच सहकार क्षेत्रातील सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाते . स्व. निकम साहेबांचे सुपुत्र संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.शेखर निकम हे संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या देदीप्यमान वाटचालीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मौलिक मार्गदर्शन व आशीर्वादाबरोबरच आदरणीय अजितदादा पवार यांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
2) आय.टी.आय.विषयी :-
वैज्ञानिक संशोधनाव्दारे नवे माहिती तंत्रज्ञान उदयास आले व औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घडून आली. उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कुशल मनुष्य बळाची उणीव भासू लागली आणि म्हणूनच औद्योगिक प्रशिक्षण देणा-या संस्था सुरु झाल्या, त्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था Industrial Training Institute म्हणजेच I.T.I. होय. शिक्षणमहर्षी स्व.गोविदरावजी निकम साहेब यांनी 1957 मध्ये सह्याद्रि शिक्षण संस्थेची स्थापना करुन कोकणातील ग्रामिण भागामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली.केवळ माध्यमिक शाळा सुरु करणे ऐवढाच मर्यादित दृष्टीकोन न ठेवता सर्व प्रकारचे व्यावसायीक शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण युवकांना मिळावे व त्यातून प्रत्येक कुटूंब समर्थपणे स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी पुढे त्यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाच्या दृष्टीने, रोजगार व स्वयंरोजगारासाठी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी, त्यांना तंत्र शिक्षणाचे ज्ञान देण्याच्या दृष्टीने सन 1984 मध्ये सावर्डे येथे आय.टी.आय.ची स्थापना केली.
Vision :-
- युवकांना रोजगार व स्वयंमरोजगारासाठी प्रशिक्षीत करणे.
Mission :-
- युवकांना तंत्रशिक्षणाचे ज्ञान व कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे.
- कारखानदारीसाठी कुशल मनुष्यबळ तंत्रज्ञ निर्माण करणे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञान विकास व रोजगाराच्या संधीबाबत युवकांना अद्यावत करणे.
- संस्थार्तगत स्थापित उत्पादन विभागात, उत्पादनांचे प्रशिक्षण देवून युवकांस स्वयंरोजगारासाठी उधकुवत करणे.
Qualities of the College :-
- भव्य प्रशस्त इमारत.
- सुसज्य कार्यशाळा-कॉम्प्युटर लॅब.
- अनुभवी प्राध्यापक वर्ग.
- गेली 40 वर्ष उत्तम निकालाची परंपरा.
- शुल्क प्रतिपूर्ती योजना (शिष्यवृत्ती ).
- नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूची सुविधा.
- ऑन जॉब ट्रेनींग (OJT).
- इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन.
- तज्ञ मार्गदर्शकांची मार्गदर्शन शिबीरे.
- स्पोर्टस कल्च्र ॲक्टीव्हीटी.
- व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा .
- तंत्र प्रदर्शनाचे आयोजन.
- विविध स्पर्धांचे आयोजन.
- गेस्ट लेक्चरर्स त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शकांची मार्गदर्शनवर वर्कशॉप.