प्राचार्य संदेश :-

         सह्याद्रि शिक्षण संस्थेने ध्यैय, धोरणे ठरवून 1984 पासून सुरु झालेल्या या सह्याद्रि ITI मध्ये कारखानदारीस उपयुक्त असे दहा व्यवसाय अभ्यासक्रम सुरु आहेत. आजच्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल घडून येत आहेत.जुने तंत्रज्ञान कालबाह्य होत आहे तर नवनवीन तंत्रज्ञान उदयास/विकसीत होत आहे आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थी हा प्रवाहा बरोबर रहावा व त्याचा सर्वांगिण विकास व्हावा. प्रशिक्षणार्थ्यांना गुणवत्ता पुर्वक व्यवसायीक शिक्षणा बरोबरच त्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांची मार्गदर्शक शिबीरे,कारखान्यांना भेटी,तंत्रविज्ञान प्रदर्शने,तसेच कला व क्रीडा गुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रम,कौशल्य स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविले जातात व्यक्तीमत्त्व विकासासाठी कार्यशाळेचे नियोजन केले जाते. तसेच या ठिकाणी उत्पादन केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामूळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मिळतो व त्याचा फायदा भविष्यात त्यांना निश्चितच मिळतो. ITI सुरु झाल्या पासून ते आजपर्यंतच्या कालखंडामध्ये प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेला विद्यार्थी हा भारतात त्याच बरोबर परदेशात नामांकित कंपनीमध्ये कार्यरत असून काही उच्च पदावर पोहचले आहेत,तर काहींनी व्यवसाय निर्माण करुन उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवले आहे.याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो. त्यांची प्रगती पाहून आजी प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा मिळते. नवीन विकसीत होणा-या तंत्रज्ञाने प्रशिक्षणार्थी अद्यावत असणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचा वेध घेवून नव-नवीन प्रयोग करणे क्रमप्राप्त आहे.संशोधकवृत्तीने प्रयोगशील प्रशिक्षणार्थी घडविणे,तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आमच्या संस्थेचे प्रत्येक ट्रेडनुसार अनुभवी प्राध्यापक वर्ग त्यांना प्रशिक्षीत करण्याचे काम करीत आहे. या आय.टी.आयच्या जडणघडणीमध्ये वेगवेगळ्या टप्यावर अनेकांचे योगदान लाभले आहे.म्हणूनच पुढील वाटचाल यशस्वीपने सुरु आहे. यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार मा.शेखरजी निकम यांचे नेहमीच प्रोत्साहान व मार्गदर्शन लाभत आहे.