

Late Shri. Govidraoji Nikam Founder Sahyadri Shikshan Sanstha
महाराष्ट्रातील कोंकण हा गिरी शिखरांच्या दुर्गम ग्रामीण प्रांत. गरीबी, अशिक्षितता, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी ग्रासलेला प्रदेश. अशा बिकट भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागात तळागाळातील सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणारे भगीरथ म्हणजेच स्व. गोविंदरावजी निकम. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षांपासून अंतिम श्वासापर्यंत कार्य जोपासले. १९५७ साली सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना करून सावर्डे येथे पहिले माध्यमिक विद्यालय सुरु केले. आज या संस्थेची ३३ माध्यमिक विद्यालये, २ मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, ५ उच्च माध्यमिक विद्यालये, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या १८ शाखा आहेत. फक्त कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना परराज्यातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करून नोकरीबरोबरच विविध व्यवसायात कार्यरत आहेत. ज्ञानावरील अमाधश्रद्धा, ध्येय, चिकाटी व अथक परिश्रम या चार सूत्रीच्या बळावर स्व. निकम साहेब शिक्षण क्षेत्रातील शिक्षणमहर्षी तसेच सहकार क्षेत्रातील सहकारमहर्षीम्हणून ओळखले जात.

Hon. Shri. Shekharji Nikam MLA, Chiplun-Sangmeshwar Executive Chairman Sahyadri Shikshan Sanstha, Sawarde
स्व. निकम साहेब यांचे सुपुत्र संस्थेचे कार्यध्यक्ष श्री. शेखर निकम हे संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या दैदिप्यमान वाटचालीत आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे मौलाचे मार्गदर्शन व आर्शिवादाबरोबर मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीमध्ये इतर विभागाशी तुलना करत कोंकण औद्योगिकदृष्ट्या मागे राहू नये म्हणून कोंकणातील युवकांना व्यवसाय व तंत्रशिक्षणाचे ज्ञान देऊन त्यांना कुशल कारागीर बनवून इतर प्रगत भागांबरोबर कोकणचाही औद्योगिक विकास होण्याच्या दूरदृष्टीने सन १९८४ मध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून आजच्या कारखानदारांस व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त असे १० व्यवसाय अभ्यासक खालील उद्देशाने सूरी केले.