
कार्याध्यक्षांचे मनोगत :-
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची दालने उपलब्ध व्हावीत, त्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण मिळावे, ही दूरदृष्टी मनात ठेवून १९५७ साली सह्याद्रिच्या कुशीतील सावर्डे गावी स्व. गोविंदरावजी निकम यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे रोपटे न्यू इंग्लिश स्कूल, सावर्डेच्या रुपात लावले आणि आज या रोपट्याचे रुपांतर एका वटवृक्षात झाले आहे. स्व. गोविंदरावजी निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती, संस्थेचा विस्तार आणि त्यांची शिक्षण क्षेत्रात असलेली दूरदृष्टी यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणातील शिक्षण क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान तर मिळालेच पण त्याबरोबर कोकणातील जनतेने त्यांना शिक्षणमहर्षी म्हणून गौरविले. प्रामुख्याने सुरुवातीपासून या संस्थेला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री स्व. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे मौलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभलेला आहे, याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत यांनी संस्थेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध प्रकारचे सहकार्य केलेले आहे. हे आम्ही कदापि विसरु शकत नाही. भारताचे माजी केंद्रीय कृषी, अन्न प्रक्रिया मंत्री ना. शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडून आमच्या संस्थेला वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, सहकार्य यामुळे आमची शैक्षणिक संस्था कोकणातील दुर्गम भागात काम करणारी एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. यासाठी वेळोवेळी स्थानिक व्यक्तींचेही सहकार्य मिळाले. हे सुध्या आवर्जुन उल्लेखित करावेसे वाटते.
संस्थेमध्ये एम. फार्मसी, एम.बी. ए. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू असून बी. एस्सी.ॲग्री, बी.एस्सी. हॉटी, बी. टेक. फुड टेक्नॉलॉजी, ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, बी. फार्मसी, बी.एड., बी.ए., हॉटेल मॅनेजमेंट, बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच डी. फार्मसी, पोलिटेक्नीक, आय.टी.आय., कृषी पदविका, डी. टी. एड., चित्र-शिल्पकला महाविद्यालय हे अभ्यासकम सर्व सोईसुविधासह संस्थेमध्ये यशस्वीरित्या चालू आहेत.
स्व. निकमसाहेबांच्या स्वप्नातील सह्याद्रि साकार करण्यासाठी अजूनही बरीच वाटचाल बाकी आहे. आम्हां सर्वांचे त्यादृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. भविष्यात सह्याद्रिला शिखरावर नेण्यासाठी असंख्य हितचिंतकांच्या शुभेच्छा, सहकार्य कामास येतील यात तीळमात्र शंका नाही. आजवरच्या सह्याद्रिच्या वाटचालीत सह्याद्रिचे विद्यार्थी देशात परदेशात आपल्या बरोबरच सह्याद्रि नांव उज्ज्वल करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आधुनिक शिक्षणप्रणालीच्या या युगात नवनवीन अभ्यासक्रमांना लागणाऱ्या सोईसुविधा पुरविण्यात येत आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही त्या सुविधा पुरविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. कारण आजचा विद्यार्थी हा भविष्यकाळातील सुजाण नागरीक व्हावा असा माझा मानस आहे. त्यादृष्टीने गैली ५०-६० वर्षांची खडकर मार्गक्रमण करणाऱ्या सह्याद्रि शिक्षण संस्थेला साजेशी बनविणं ही तुमच्या आमच्या सर्वांची एक बांधिलकी असेल, धन्यवाद!