



DSC_3953
Mechanic Refrigeration and Air Conditioner
DSC_3957
Day 1 (90)
Day 1 (91)
ट्रेडचे नाव :- रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर टेक्नीशियन (Refrigeration and Air Conditioner Technician)
ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/2004-TC, Date - 30.06.2004 & DGET-12/01/2004-TC, Date - 19.10.2004
प्रवेश पात्रता :- 10 वी. पास
प्रवेश क्षमता :- 24
शिकवण्यात येणारे कौशल्य :-
या व्यवसायामध्ये रेफ्रिजरेटर, वॉटर कुलर, डीप फ्रीजर, आईस कँडी प्लांट, आईस क्रीम मशिन, आईस प्लांट, तसेच विंडो ए.सी.,स्प्लिट ए.सी., सेंट्रल ए.सी., VRV/VRF, कार ए.सी., बस ए.सी., रेल्वे ए.सी. इत्यादी म्हणजेच घरगुती, व्यापारी आणि औ्द्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या सर्व मशिन्सचे सर्व्हिसिंग, रिपेअरींग शिकवले जाते, तसेच या मशिन मध्ये येणारे दोष व त्यांची कारणे शोधुन त्यावर आवश्यक उपाययोजना करणे. याचे प्रशिक्षण दिले जाते.
रोजगारांच्या संधी शासकीय नोकरी :-
शासकीय नोकरी :-
- रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर टेक्नीशियन शिल्पनिदेशक
- सेंट्रल रेल्वे
- एम.एस.आर.टी.सी. (एस.टी.महामंडळ)
- एम.एस.ई.बी. (पॉवर हाऊस जनरेशन विभाग)
खाजगी नोकरी :-
- ब्लयु स्टार, व्होल्टास, एल.जी. सॅमसंग, व्हर्लपुल, हायर, डायकीन, मित्सुबिशी, कॅरीअर, बॉश, तिभेर, तोशिबा, किर्लोस्कर, गोदरेज, इमर्सन, आयडिया, ओनिडा, देवू हिताची व इतर कंपन्यामध्ये ए.सी. टेक्नीशियन म्हणून संधी उपलब्ध आहे.
- कोल्ड स्टोअरेज, दुध डेअरी तसेच आईस कँन्डी आणि बर्फ बनविणाऱ्या कंपन्यामध्ये रोजगाराची संधी.
- केमिकल्स इंडस्ट्रीज, स्पेस मशिनरी व इक्विपमेंट स्टोअरेज, औषधे बनविणाऱ्या कंपन्या,कॉटन व नायलॉन् मॅन्युफॅक्चरींग इत्यादी कंपन्यामध्ये ए.सी. टेक्नीशियन म्हणून संधी उपलब्ध आहे.
- सिनेमा थिएटर्स, फाईव्ह स्टार हॉटेल्स्, मॉल, हॉस्पीटल, आय.टी.सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्या मध्ये ए.सी. मेकॅनिक किंवा प्लांट ऑपरेटर म्हणून संधी.
- ट्रान्सपोर्ट एअर कंडिशनिंग कार ए.सी., बस ए.सी.ए कंटेनर ए.सी. एअरोप्लेन ए.सी.,मरीन शिप ॲकोरडींग इत्यादी मध्ये ए.सी. मेकॅनिक म्हणून संधी.
व्यवसाय (स्वयंरोजगार ) :-
- रेफ्रिजरेटर, वॉटर कुलर, बॉटल कुलर, डीप फीजर, विंडो ए.सी., स्प्लिट ए.सी., इत्यादी मशिनच्या सर्व्हिसिंग आणि रिपेअरींगचे वर्कशॉप सुरू करता येते. तसेच ॲन्युअल मेटेनन्स् कॉन्ट्रॅक्ट घेता येते.
- विविध कंपन्याचे (होम अप्लायसेंनचे) सर्व्हिस सेंटर सुरु करता येते.
- कार एअर कंडिशनर रिपेअरींगचे वर्कशॉप सुरु करता येते.
- अंगभुत कौशल्ये, अथक परिश्रम जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर यशस्वी उद्योजक होता येते.